अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कापडाच्या कारखान्यात भीषण आगली आहे. या आगी आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदामधील नारोल भागात शनिवारी रात्री एका कापडाच्या कारखान्याला आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजून किती जखमी झाले याची माहिती नाही. तसेच त्यांची ओळखही पटलेली नाही. अजूनही आग विझवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळालेले नाही.