वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवारला सुवर्ण तर मयुरी देवरे रौप्यपदकाची मानकरी
सातारा – गुवाहाटी (आसाम) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत सातारा एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिच्या सुवर्ण पदकानंतर साताऱ्याला दुसरे सुवर्ण पदक मिळवून देण्यात वेटलिफ्टर वैष्णवी संतोष पवार यशस्वी ठरली आहे. साताऱ्याची दुसरी वेटलिफ्टर मयुरी रामचंद्र देवरे हिने रौप्य पदकावर मोहर उमटवली. दोघींच्या यशामुळे जिल्हयाची मान उंचावली आहे.
अनंत इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवी पवार व मयुरी देवरे यांनी पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकांची लयलूट केली होती. आता गुवाहाटीतील तिसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत त्या दोघी पदकाच्या मानकरी ठरल्या. 81 किलो वजन गटातील यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैष्णवी पवार हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले तर 81 किलो ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मयुरी देवरेने द्वितीय
क्रमांक मिळवत सिल्व्हर पदक पटकावले.
वैष्णवीने स्नॅच 62 किलो, किलिन अँड जर्क 72 किलो असे एकूण वजन 134 किलो उचलले. मयुरीने स्नॅच 76 व किलिन अँड जर्क 105 किलो असे एकूण 181 किलो वजन उचलले. या दोघींना अनंत इंग्लिश स्कूलचे क्रीडा मार्गदर्शक जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. वैष्णवी पवार, मयुरी देवरे, प्रशिक्षक जितेंद्र देवकर यांच्यावर सातारच्या क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.