पोर्ट एलिझाबेथ : इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिस-या सामन्यात १ डाव अन् ५३ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात नाबाद १३५ धावांची खेळी करणारा आॅली पोप सामन्याचा मानकरी ठरला. या विजयासह चार कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे.
RESULT | SA: 237
A dominant display with bat & ball sees England take the match by an innings & 53 runs over the Proteas.
The Three Lions lead the series 2⃣ – 1⃣
🇿🇦 will look to reflect & bounce back stronger going into the final test of the series.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/NtIKIydD2A
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 20, 2020
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑली पोप नाबाद १३५, बेन स्टोक्स १२९, सॅम करन ४४, जक क्राॅल ४४, मार्क वुड ४२ आणि डोमिनिक सिबलीच्या ३६ धांवाच्या खेळीच्या जोरावर पहिला डाव १५२ षटकांत ९ बाद ४९९ धावसंख्येवर घोषित केला होता. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत पहिल्या डावत केशव महाराजने ५-१८०, कगिसो रबाडाने २-९७, ऐनरिक नाॅर्टजेने १-९७ आणि डेन पॅटरसनने १-६२ गडी बाद केले.
त्यानंतर रविवारी इंग्लंडने डोमनिक बेस ( ५-५१), स्टुअर्ट ब्राॅड (३-३०), सॅम करन (१-३२) आणि बेन स्टोक्स (१-२६) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २०९ धावांत संपवून २९० धावांची आघाडी घेतली व आफ्रिकेवर फाॅलोआॅन लादला.
त्यानंतर फाॅलोआॅनची नामुष्की ओढवल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला. इंग्लंडने जो रूट (४-८७), मार्क वूड (३-३२), स्टुअर्ट ब्राॅड (१-१४) आणि डोमनिक बेस ( १-३६) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ८८.५ षटकांत २३७ वर संपुष्टात आणला व एक डाव अन् ५३ धावांनी विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीत दुस-या डावात केशव महाराजने ७१, डेन पॅटरसनने ३९ आणि फाफ डू प्लेसीने ३६ धावांची खेळी केली.