सेंट किट्स : लेंडल सिमंस (९१) आणि एविन लुइसच्या (४६) तडाखेबाज खेळीच्या जोरावर वेस्टइंडिजने तिस-या टी-२० सामन्यात आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह तीन टी-२० सामन्यांची मालिका वेस्टइंडिजने १-१ ने बरोबरीत सोडवली आहे. मालिकेतील पहिला सामना आयर्लंडने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळं रद्द झाला होता.
#WIvIRE A dominating performance to win the last T20I & level the Series!👊🏾 #MenInMaroon🌴 #ItsOurGame pic.twitter.com/hDMVpZzInw
— Windies Cricket (@windiescricket) January 20, 2020
वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा डाव १९.१ षटकांत १३८ धावसंख्येवर आटोपला. आयर्लंडकडून केविन ओ ब्रायनने सर्वाधिक ३६, एड्रू बल्बराइनने २८, बैरी मैकार्थीने १८ आणि पाॅल स्टर्लिंगने ११ धावांची खेळी केली. विंडीजकडून गोलंदाजीत कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावोने प्रत्येकी ३ तर शरफेन रदरफोर्ड आणि रोमरियो शेफर्डने प्रत्येकी १ गडी बाद केला.
1⃣0⃣ SIXES!😱 Lendl raced to his best ever T20I score for the #MenInMaroon🌴!
Well done Champ 👊🏽
#ItsOurGame #WIvIRE pic.twitter.com/QzmPq5Godd— Windies Cricket (@windiescricket) January 20, 2020
प्रत्युत्तरात १३९ धावांचे आव्हान वेस्टइंडिजने अवघ्या ११ षटकांत १ बाद १४० धावा करत सहज गाठले. लेंडल सिमंसने ४० चेंडूत ५ चौकार व १० षटकारांसह नाबाद ९१ धावांची खेळी केली तर एविन लुइसने २५ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. निकोलस पूरन १ धावेवर नाबाद राहिला. आयर्लंडकडून सिमी सिंहने १ गडी बाद केला.