बॉलीवूडचा चॉकलेट हिरो कार्तिक आर्यन सध्या सातत्याने चर्चेत येताना दिसतो. त्याच्या अभिनयाचीही अनेकांकडून प्रशंसा केली जाते. सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकने बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना ललकारले आहे. ही ललकारी युद्धासाठी नाही!! तर दीपिकासाठी आहे.
View this post on Instagram
Aced it @deepikapadukone ??#DheemeDheemeChallenge ? . . #PatiPatniAurWoh 6thDec #5DaysToGo
बुचकळ्यात पडलात ना? थांबा… अहो मंडळी, या कार्तिक आर्यनने अलीकडेच बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणचे आणि आपले स्वतःचे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केला आहे. यामध्ये कार्तिक अनोख्या लूकमध्ये दिसून येत आहे. तसेच दीपिका तिच्या “ओम शांती ओम’मधील लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
Sunday Offer #ChintuTyagi For Sale ? . . #PatiPatniAurWoh #PoseLikeKartikAaryan
फोटो शेअर करताना कार्तिकने काही ओळीही कॅप्शन म्हणून लिहिल्या आहेत. त्यात तो म्हणतो” है किसी डायरेक्टर में दम’… याचा अर्थ कार्तिकला आता दीपिकासोबत काम करायचे आहे. यासाठी त्याने बॉलीवूडमधील सर्व दिग्दर्शकांना खुले आव्हान दिले आहे.
दीपिकाने या फोटोवर कमेंट देतना म्हटले आहे की, हाच फोटो का?’ यावर कार्तिकने उत्तर दिले आहे”कारण तेव्हापासून संपूर्ण जग तुझ्यासोबत काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे’. आता पाहूया कोणता दिग्दर्शक यासाठी पुढे येतो आणि ही जोडी आपल्याला कधी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळते !