केंदूर- करंदी (ता. शिरूर) येथील गव्हाळमळा ते जातेगाव खुर्द शिव रस्त्यासाठी 8 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
शिरूर- आंबेगाव विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या 2019-20 च्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 58 कामांसाठी तीन कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. करंदीच्या गव्हाळमळा ते जातेगाव खुर्द शिव रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होता.
या रस्त्यावर नेहमी दलदल होत असल्याने शेतीमाल बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याच अनुषंगाने स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या 58 विकासकामांमध्ये या रस्त्याचा समावेश केला आहे. करंदी, जातेगाव खुर्दच्या शेतकऱ्यांची ही समस्या दूर होणार आहे.