मुंबई – बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग आता वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. पद्ममावत, गली बॉयनंतर त्याचा 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर आता रणवीर त्याच्या नवीन चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. आता रणवीर गुजराती व्यक्तीचा रोल साकारणार आहे. जयेशभाई जोरदार या त्याच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक त्याने आज शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा लूक व्हायरल झाला आहे.
First look… #RanveerSingh in and as #JayeshbhaiJordaar… Set in #Gujarat, the film will see Ranveer play the role of a #Gujarati man… Directed by Divyang Thakkar… Produced by Maneesh Sharma… This will be Ranveer’s next release after #83TheFilm… #YRF presentation. pic.twitter.com/20D3JB3i19
— taran adarsh (@taran_adarsh) December 4, 2019
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीर महिलांना वाचवत असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी त्यांचे चेहरे साडीच्या पल्लूने झाकले आहेत. रणवीरने पोस्टर शेअर करताना लिहलय की जयेशभाई एकदम जोरदार..
View this post on Instagram
JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! ???? #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf
या फोटोत रणवीरने नारंगी रंगातील प्रिंटेड पोलो नेक टीशर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातलेली पहायला मिळत आहे. याचबरोबर त्याची हेअरस्टाईल एकदम हटके करण्यात आली आहे. एकूणच काय तर रणवीरचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर यांनी केले आहे. या चित्रपटात आणखी कोण कोण असणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.