मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आज ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा धमाकेदार ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये ‘स्वराज्यापेक्षा जास्त प्रिय महाराजांसाठी काहिच नसल्याचं दाखवण्यात आलं आहे’. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ १० जानेवारी २०२० रोजी चित्रपट गृहात येणार आहे.
तानाजींच्या पराक्रमाची कथा सांगणारा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वीर तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा अभिनेता अजय देवगन साकारणार असून, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता सैफ अली खान, शरद केळकर, पंकज त्रिपाठी अशी दमदार स्टारकास्ट चित्रपटात दिसून येणार आहे.
दरम्यान, ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा नुकतंच ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात झाले होते, यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ तानाजींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील अभिनेता अजय देवगणचा फर्स्ट लुक समोर आला होता.
काही दिवसांपूर्वी ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा नुकतंच ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आलं होते. यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ तानाजींची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.