पुणे: स्पार्क करंडक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सिद्धांत मेमाणे (2-13) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीएमपी ग्रुप संघाने स्पार्क अ संघावर 5 गडी राखून विजय मिळवला.
स्पार्क क्रिकेट मैदान, जांभे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पीएमपी ग्रुप संघाच्या सिद्धांत मेमाणे 2-13, आदित्य के 1-6, श्लोक नवगिरे 1-2, धैर्य माने 1-8, प्रसाद आंबळे 1-12) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे स्पार्क अ संघ 25 षटकात 7 बाद 66 धावाच करू शकला.
यात सम्यक सहस्त्रबुद्धे 9, सार्थ माळी नाबाद 9 यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान पीएमपी ग्रुप संघाने 12.2 षटकात 5 बाद 67 धावा करून पूर्ण केले. यात दीप्ती सोनावणे 18, हर्ष पाष्टे 18, धैर्य माने 14 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी सिद्धांत मेमाणे ठरला.
सविस्तर निकाल
साखळी फेरी : स्पार्क अ : 25 षटकात 7 बाद 66धावा (सम्यक सहस्त्रबुद्धे 9, सार्थ माळी नाबाद 9, सिद्धांत मेमाणे 2-13, आदित्य के 1-6, श्लोक नवगिरे 1-2, धैर्य माने 1-8, प्रसाद आंबळे 1-12)
पीएमपी ग्रुप : 12.2 षटकात 5बाद 67 धावा (दीप्ती सोनावणे 18(18), हर्ष पाष्टे 18(29), धैर्य माने 14 (16), आयुष देवकर 3-23, सोहम मोहिते 2-6. सामनावीर – सिद्धांत मेमाणे