पुणे: नगरसेवक पृथ्वीराज सुतार आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत वेदांत अय्यर, जय दीक्षित, उत्कर्ष अहेर, सिद्धांत देसाई, अद्वैत भातखंडे, आर्यन घाटगे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात संघर्षपूर्ण लढतीत वेदांत अय्यरने अथर्व रत्नोजीचा 8-5 असा तर जय दीक्षितने धृव साळुंखेचा 8-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
आर्यन घाटगेने प्रथमेश निगडेचा, उत्कर्ष अहेरने श्लोक गांधीचा तर ऋतुराज सायखेडकरने सिद्धांत गोयलचा प्रत्येकी 8-5 असा पराभव केला. सिद्धांत देसाईने साईराज श्रोत्रीचा 8-0 असा तर अद्वैत भातखंडेने अंजनेय बॅनर्जीचा 8-3 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
सविस्तर निकाल-
पहिली फेरी- मुले : सिद्धांत देसाई वि.वि साईराज श्रोत्री 8-0, अद्वैत भातखंडे वि.वि अंजनेय बॅनर्जी 8-3, आर्यन घाटगे वि.वि प्रथमेश निगडे 8-5, ऋतुराज सायखेडकर वि.वि सिद्धांत गोयल 8-5, देवब्रत बॅनर्जी वि.वि अथर्व कुलकर्णी 8-4, अदित्य यादव वि.वि शंतनू छापरीया 8-4, उत्कर्ष अहेर वि.वि श्लोक गांधी 8-5, अरिंदम बीट वि.वि अदित्य अय्यंगार 8-3, वेदांत अय्यर वि.वि अथर्व रत्नोजी 8-5, जय दीक्षित वि.वि ध्रुव साळुंखे 8-3