पुणे – पुणे ते एर्नाकुलम मार्गावर धावणाऱ्या पूर्णा एक्स्प्रेसचा वेग शनिवारपासून (दि. 2) वाढवण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांचा 2 तास 35 मिनिटांचा वेळ वाचणार असल्याचे असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे-एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस पुणे स्थानकाहून दर शनिवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांऐवजी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी एर्नाकुलम येथे सोमवारी सकाळी 8 ऐवजी मध्यरात्री 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.
आता नव्या वेळापत्रकानुसार, पुणे विभागातील सातारा येथे मध्यरात्री 12 वाजून 43 मिनिटांनी, कराडला मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी, सांगलीला मध्यरात्री 3 वाजून 15 मिनिटांनी आणि मिरज येथे पहाटे
4 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. दरम्यान, यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून इतर गाड्यांशी “कनेक्टिव्हिटी’ सुधारणार आहे.