आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला दोन वर्षासाठी निलंबित केले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एका बुकीने मॅच फिक्सिंगसाठी शाकिबकडे संपर्क साधला होता, परंतु त्याने क्रिकेट संस्थेला याबाबत माहिती दिली नाही. दोन वर्षासाठी निलंबित झाल्यामुळे शाकिब 3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन टी -20 आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही. पुढच्या वर्षीही तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकणार नाहीत.
ICC: Shakib Al Hasan said, “I am extremely sad to have been banned from the game I love, but I completely accept my sanction for not reporting the approaches. ICC ACU is reliant on players to play a central part in fight against corruption&I didn’t do my duty in this instance.” https://t.co/UCBmWLylTH
— ANI (@ANI) October 29, 2019
या बंदीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाकिब म्हणाला, ‘मला खूप दुःख होत आहे की माझ्या आवडता खेळ खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीला या प्रकरणाची माहिती न देण्याची चूक मी मान्य करतो. क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाबाबत आयसीसीचे अँटी करप्शन युनिट कडक भूमिका घेत आहे आणि मी माझ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या नाहीत.