नवी दिल्ली : पाकिस्तानातील दरनार साहीब आणि पंजाबमधील गुरूदासपूर यरथील डेरा बाबा नानक यांना जोडणाऱ्या कर्तापूर कॅरिडोरचे बहुप्रतिक्षीत उद्घाटन नऊ नोव्हेंबरला होणार आहे. यादिवशी डेरा बाबा नानक येथील भाविकांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील,अशी माहिती सुत्रांनी दिली.
कॅरिडोर पासून सुमारे तीन किमी अंतरावर होणाऱ्या सभेत मोदी आपले विचार मांडतील. मोदी यांच्या हस्ते या कॅरिडोर आणि प्रवासी सुविधा इमारतीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. कर्तारपूरला जाणाऱ्या पहिल्या जथ्थ्याला मोदी झेंडा दाखवण्याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग या या जथ्थ्यातून प्रवास करणार आहेत.
भारत आणि पाकिस्ताने या ऐतिहासिक कर्तारपूर कॅरिडोर कार्यान्वित करण्याबाबत स्वाक्षीे केली आहे. पाकिस्तानमधील पवित्र दरबार साहीब येथे दर्शनासाठी जाणअऱ्या भाविकांना विहसाशिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. या खॅरिडोरचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, प्रती भाविक 20 अमेरिकन शुल्क पाकिस्तानला देण्याबाबतच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नाही.