मंचर- एकलहरे (ता. आंबेगाव) येथील मतदान केंद्राला आंबेगाव-जुन्नरच्या निवडणूक आयोगामार्फत नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक चंदर शेखर यांनी भेट देऊन माहिती घेतली, अशी माहिती मुख्याध्यापिका मनिषा कानडे यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीची प्रशासकीय प्रक्रिया जाणून घेण्यासाठी चंदर शेखर यांनी भेट देऊन निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी समनव्य अधिकारी प्रशांत कडूसकर, दिलीप मालिये, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश लहामटे, झोनल अधिकारी हेमंत जाधव आदी उपस्थित होते. तलाठी अनुप कावणे, ग्रामसेवक गणेश राजगुरू व राहुल डोके यांनी मतदान केंद्र क्रमांक 107 व 108 ची माहिती दिली. हरियाणाचे मनुष्यबळ विकासाचे सचिव असलेल्या चंदर शेखर यांनी शाळेत प्रत्यक्ष वर्गात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापिका मनीषा बाळासाहेब कानडे, उपशिक्षक प्रदीप चासकर यांचे कौतुक करुन निवडणुकीनंतर पुन्हा शाळेस भेट देण्याचे आश्वासित केले. यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.