हॉलिवूडमधील देशी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा सध्या आपल्या आगामी “द स्काई इज पिंक’ चित्रपटाच्या प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यासाठी ती दररोज कोणत्या न कोणत्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होत आहे. याच वेळी नवरात्रीनिमित्त तिने वेळात वेळ काढून दुर्गा माताचे दर्शन घेतले. तिला उत्तर मुंबईतील सर्बोजनीन दुर्गा पूजा पंडाल येथे रविवारी स्पॉट करण्यात आले.
या दुर्गा पंडालवेळी प्रियांका ट्रडिशनल लुकमध्ये दिसली. तिने थ्रेड वर्क असलेला व्हाईट सुट घातला होता. यावेळी प्रियांकाने प्रथम दुर्गा माताचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतले. तत्पूर्वी, अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया यांच्यासोबत पुजा केली होती. तसेच काजोलनेही आपला मुलगा युगसोबत भेट दिली. याशिवाय राणी मुखर्जी, तनुजा मुखर्जी आणि तनीषा मुखर्जी आदी कलाकारही दिसले.
दरम्यान, “द स्काई इज पिंक’बाबत सांगायचे झाल्यास या चित्रपटात पुन्हा एकदा प्रियांका-फरहान अख्तरची जोडी धम्माल करणार आहे. यात त्यांच्या मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम साकारत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.