मुंबई – अभिनेता अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार हे अगोदरच्या पोस्टरमधून सांगण्यात आले होते. आता त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Release date finalized… #Marathi film #TripleSeat to release on 25 Oct 2019… Stars Ankush Chaudhari and Shivani Surve… Directed by Sanket Prakash Pavse… Produced by Narendra Shantikumar Firodia and Swapnil Sanjay Munot… AA Films release. #Diwali2019 pic.twitter.com/V4hhNr1kRi
— taran adarsh (@taran_adarsh) September 26, 2019
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड अभिजित अरविंद दळवी यांचे आहे.
दरम्यान, चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.