विधानसभेसाठी शुक्रवारपासून भरा अर्ज
पुणे – जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या शुक्रवारपासून (दि.27) सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज संबधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 4ऑक्टोबरपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनाकडून विधानसभेची निवडणुकीची तयारी सुरू आहे. विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.