बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री झिनत अमानचा मुलगा जहान खान हा कपिल शर्मा द्वारा दिग्दर्शित “डून्नो वाय ः लव इज लव’ या चित्रपटातून एक संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपले करिअर सुरू करणार आहे.
याबाबत जहान म्हणाला, चित्रपटसृष्टीत पाउल ठेवण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. माझ्यासाठी ही एक चांगली सुरुवात आहे. या चित्रपटात कपिल शर्मासोबत काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शविला आणि या प्रॉजेक्टमध्ये मला एक गाणे तयार करण्याची संधी दिली.
जहानसोबत काम करण्याबाबत कपिल म्हणाला, जहान एक खुपच उत्कृष्ट कंपोझर आहे आणि बॉलिवुडमध्ये त्याचे भविष्य खूपच उज्ज्वल आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला राहिला असून भविष्यातील त्याच्या परियोजनांसाठी माझ्या लाख-लाख शुभेच्छा.
दरम्यान, या चित्रपटात झरीना वहाब, मोना आंबेगावकर आणि किटू गिडवानी आदी कलाकार झळकणार आहेत. कपिल शर्माच्या या आगामी “डून्नो वाय ः लव इज लव’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही खूप उत्सुकता निर्माण झाली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाळ करणार असल्याचे समजते.