नगर – आज धावपळीचे जीवनमान यामुळे प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्यातरी व्याधीने ग्रासलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. यासाठी नियमित आरोग्य तपासणी करुन घेऊन वेळीच उपचार केल्यास आपले आरोग्य निरोगी राहू शकते. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने सर्वसामान्यांना विविध शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येते ही समाजाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे. दिवसेंदिवस सर्वसामान्यांचा विश्वास वाढत असून, हॉस्पिटल करत असलेल्या या मानवसेवेच्या कार्यास आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन मर्चंटस बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, समाजभुषण हस्तीमल मुनोत यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जन्मदिनानिमित्त हॉस्पिटलच्यावतीने आयोजित मोफत न्युरोलॉजी तपासणी शिबीराचे उदघाटन हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संयोजक मोडालाल जगन्नाथ बायड (महावीर ग्रुप), व परिवार मर्चंटस बॅंकेचे उपाध्यक्ष सुभाषलाल बायड, ईसीएचएस पॉलिक्लीनिकचे निवृत्त कर्नल आनंद स्वरुप, मर्चंटस बॅंकेचे संचालक आनंदराम मुनोत, किशोर गांधी, अमित मुथा, मीनाताई मुनोत, न्युरोलॉजिस्ट डॉ.गौतम काळे, डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, आशिष भंडारी, सतीश(बाबूशेठ) लोढा आदि उपस्थित होते.
डॉ.प्रकाश कांकरिया यांनी प्रास्तविकात, आम्ही राबवत असलेल्या या शिबीराच्या माध्यमातून दानशूरांच्या शाबासकीमुळे एक प्रेरणा मिळते. आणि नव्या उमेदीने शिबीरे घेण्यास मदत होते.या आरोग्य मंदिरात होणाऱ्या शिबिरांमुळे गरीब व गरजु रुग्णांना जो लाभ मिळतो. संयोजक सुभाष बायड म्हणाले आम्ही हॉस्पिटलसाठी जे काम करत आहे, ते परमेश्वराचे देणे म्हणून करत आहोत. याप्रसंगी कर्नल आनंद स्वरुप यांनीही शिबीरासाठी शुभेच्छा दिल्या.न्यूरोलॉजीस्ट डॉ.गौतम काळे म्हणाले, मनुष्याची प्रत्येक क्रिया ही मेंदूच्या आदेशाने होत असते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मेंदूवर अनेक प्रकारे ताण पडत आहे, त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. न्युरोलॉजी विभागाबद्दल माहिती देतांना संतोष बोथरा यांनी, डोकेदुखी, अपस्मात, पॅरेलिसीस, कंबरदुखी, नसांचे विकार, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांवर उपचार करण्याकरिता मेंदूविकास तज्ञ डॉ.गौतम काळे उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमध्ये सिमेन्सचे जागतिक दर्जाचे नामांकित कंपनीचे एमआरआय मशिन 1.5 टेस्लाच्या मशिनद्वारे एमआरआय अत्यल्प दरातमध्ये केले जाते. सिमेन्स कंपनीचे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक 16 स्लाईस सोम्याटोम स्कोप सीटी स्कॅन मशिन उपलब्ध, सीटी स्कॅन, सीटी ऍन्जीओग्राफी, ईईजी इ. तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जातात.शिबीरात 154 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. दि.9 ऑगस्ट रोजी स्त्री रोग, व गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे.