महाळुंगे इंगळे – मेदनकरवाडीतील 45 वर्षीय विवाहित महिलेला लाकडी दांडक्याने, दगडी पाट्याने, कुकरच्या झाकणाने व फरशीच्या तुकड्याने गंभीर मारहाण करून निर्घृण खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) रात्री उशिरा बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना शंकरनगरमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. अनिल मधुकर हेंद्रे, सुवर्णा हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे व सुशीला शांताराम भुसारे (सर्व रा. मेदनकरवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर कल्पना विक्रम शितोळे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विक्रम नारायण शितोळे (वय 48) यांनी फिर्याद दिली होती.