नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपला हरियाणात मोठे यश मिळाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रोज एक नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. म्हणून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सर्व भरती झालेल्या उमेदवारांच्या गुणांची तपासणी झाली पाहिजे आणि निकाल सार्वजनिकरित्या जाहीर केला पाहिजे, अशी मागणी करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
हरियाणा के युवाओं का भविष्य हुआ अंधकार,
सरकारी नौकरियों में धांधलियों का लगा अंबार !
पिछले पाँच साल में हरियाणा में हुई सभी भर्तियों के सारे उम्मीदवारों के लिखित परीक्षाओं और इंटरव्यू के नम्बर सार्वजनिक किए जांए।
मेरा बयान:- pic.twitter.com/5TU164qCBs
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 9, 2019
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला ट्विट केले आहे की,’हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सरकारमध्ये नोकर भरतीत घोटाळे होत आहे. रोज नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना याचा फटका बसत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. हरियाणाच्या युवकांचे भविष्य अंधारात आहे. भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.’ तत्पूर्वी, आसाममध्ये नोकर भरतीत लाचखोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार आर.पी.शर्मा यांच्या मुलीला अटक केले होते.