पुणे – सहकार क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या जनता सहकारी बॅंक लि., पुणे च्या टिळक रस्ता पुणे शाखेस नुकतेच आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले. असे मानांकन मिळविणारी ही बॅंकेची पहिली शाखा आहे. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी येथे दिली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला बॅंकेचे उपाध्यक्ष अभय माटे, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, ग्राहक पेठचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत पाठक, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य शेठ, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना संस्थापक संजय कुलकर्णी, लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीं पुणे विभाग प्रमुख सुशील जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लेले म्हणाले, फेब्रुवारी 2019 मध्ये टीयुव्ही या कंपनीने टिळक रस्ता पुणे शाखेचे दोन टप्प्यात आडिट पूर्ण केले. या प्रक्रियेनंतर बॅंकेच्या या शाखेस आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बॅंकेच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी बॅंकेचे आयएसओ सल्लागार शशिकांत सातभाई आणि आयटी विभागातील सेवकांनी मोलाची भूमिका बजावली. टिळक रस्ता शाखेचे मुख्य व्यवस्थापक महेश काळे आणि सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.