Entertainment । बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशात सुहाना खानने एक व्हिडिओ पोस्ट करून इंटरनेटवर तिच्या ब्रेकअपची घोषणा केली. सुहानाची पोस्ट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सुहानाचे ब्रेकअप कसे आणि का झाला अशी चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
मात्र सुहानाचे खऱ्या आयुष्यात ब्रेअप झाले नसून तिने एका जाहिरातीसाठी केलेल्या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर चाहते अंदाज लावत आहे. सुहानाने लिहिले की, “माझ्याकडे एक बातमी आहे. मी माझ्या साबणासोबत ब्रेकअप केले आहे. हा जाहिरातीचा व्हिडिओ आहे ज्याची सुहाना खान ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे आणि एक काळ असा होता जेव्हा शाहरुख खान देखील या साबणाचा ब्रँड ॲम्बेसेडर होता.
सुहानाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत ज्यात सुहाना खानचा अफवा असलेला बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा यांची आई आणि अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा यांचा समावेश आहे. तिने एक गुलाबी रिबन इमोजी पोस्ट केली आहे. श्वेता नंदाच्या कमेंटनंतर यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एकाने लिहिले, “अहो सासूनेही कमेंट केली.” दुसऱ्याने लिहिले, “अमिताभ बच्चन यांना त्यांच्या नातवाने सुहाना खानशी लग्न करावे असे वाटत नाही का?” तिसऱ्याने लिहिले, “सुहाना लवकरच श्वेता नंदाची सून होणार आहे.’अशा अनेक प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.
हे वाचले का ? KGF फेम यशसोबत काम करण्यास करीना कपूर खान ‘नकार’