पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंदिरा बेदीने व्यक्त केल्या भावना

Entertainment । अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशलवर ती नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत असते. पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदीने पहिल्यांदाच आपलं मत एका मुलाखतीत सांगितले आहे. सध्या तिचा मुलाखतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राज कौशल यांचा जून 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या तीन वर्षांत मंदिराने याबाबत बोलणे टाळले आहे. मात्र आता तिने आपल्या दुःखाबाबत सांगितले आहे. मंदिरा म्हणाली की, ‘मी राजचा उल्लेख ऐकून खूप वेळ रडले आहे. पण आता माझी हिंमत वाढवली आहे. मी आधी खचले होते.’
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितले की,’पती गमावल्यानंतरचे पहिले वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते, परंतु हळूहळू सर्वकाही ठीक झाले. माझी मुले आणि मी दररोज त्याच्याबद्दल विचार करतो. आम्ही राजला विसरलो असे नाही. पहिले वर्ष खूप जास्त कठीण होते. त्यावेळी सर्व गोष्टी हाताळणे पूर्णपणे अशक्य होत्या. पहिला वाढदिवस, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस, पहिले नवीन वर्ष. मात्र दुसऱ्या वर्षी मी आणि माझ्या मुलांनी एकमेकांना सांभाळले. आताही अशा काही गोष्टी आहेत, ज्या करणे तिला अजूनही कठीण वाटते. ‘ अस म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.





