South Africa T20 WC Squad 2024 : दक्षिण आफ्रिकेने T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. आफ्रिकेने एडन मार्करमला कर्णधार बनवले आहे. सध्या मार्करम आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. 15 सदस्यीय संघाव्यतिरिक्त आफ्रिकेने प्रवासी राखीव संघात तीन खेळाडूंचाही समावेश केला आहे.
आफ्रिकन संघात अशा अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, जे सध्या खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीला संघात संधी मिळाली आहे. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात कोएत्झी आफ्रिकेचा भाग होता. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आयपीएलच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
संघ दिसत आहे संतुलित…
आफ्रिकेने T20 विश्वचषकासाठी #T20WorldCup निवडलेला संघ खूपच संतुलित दिसत आहे. संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंचा चांगला मेळ असल्याचे दिसून येत आहे. संघात कर्णधार एडन मार्करम, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा आणि तबरेझ शम्सी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
This is your T20 World Cup Proteas Men’s team South Africa! 🌟 Let’s rally behind our squad as they aim to conquer the world stage and bring home the gold! 🏆💥
Stay tuned for the out of this world performances! #T20WorldCup #OutOfThisWorld #BePartOfIt pic.twitter.com/NVwYYsN7cH
— Proteas Men (@ProteasMenCSA) April 30, 2024
आफ्रिका 3 जूनपासून सुरू करणार मोहीम…
टी 20 विश्वचषक 2024 स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे, परंतु आफ्रिका सोमवार, 3 जूनपासून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. आफ्रिकेचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे. ड गटात आफ्रिकेचा समावेश आहे.
T20 विश्वासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ –
एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह – नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.