T20 World Cup 2024 (India vs Canada) : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील आणखी एका सामन्यात पावसाने बाजी मारली आहे. आता भारत आणि कॅनडाच्या सामन्यात पाऊस खलनायक ठरला आहे. मात्र खराब आउटफिल्डमुळे आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. वास्तविक, फ्लोरिडामध्ये सततच्या पावसामुळे मैदान खूप ओले झाले होते. मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण मैदान खेळण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे सुमारे दीड तास वाट पाहिल्यानंतर पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
🚨 UPDATE 🚨
The #CANvIND match has been called off due to wet outfield.
Both the teams share a point each.#T20WorldCup | #TeamIndia
📸 ICC pic.twitter.com/6KiRpe9Y2D
— BCCI (@BCCI) June 15, 2024
फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर भारत आणि कॅनडा यांच्यात सामना होणार होता. या सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता होणार होती. मात्र खराब आउटफिल्डमुळे सामन्याची नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही.
यानंतर मैदानावरील कर्मचारी मैदान खेळण्यासाठी योग्य बनवण्याचे काम करत राहिले, मात्र मैदान चांगलेच ओले होते. अशा स्थितीत सुमारे दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.
आता सुपर-8 चा थरार…
भारतीय संघाने अ गटातून आधीच सुपर एटमध्ये प्रवेश केला असून हा सामना रद्द झाल्याने त्यात काही फरक पडलेला नाही. कॅनडाविरुद्ध भारतीय संघाला सुपर एटपूर्वी आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी होती, मात्र पावसामुळे ही संधी हुकली. आता भारतीय संघ 20 जून रोजी सुपर एटमध्ये अफगाणिस्तानशी भिडणार आहे.