BSP Candidate List । बहुजन समाज पक्षाने (BSP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 11 उमेदवारांची नावे असून त्यात 3 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे. पक्षाने ज्या मुस्लिम उमेदवारांना उभे केले आहे त्यात मुस्लिम खान, अतहर जमाल लारी आणि ख्वाजा समसुद्दीन यांचा समावेश आहे.
बसपाने वाराणसीतून अथर जमाल लारी यांना उमेदवारी दिली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर मुस्लिम खान यांना बदायूंमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर ख्वाजा समसुद्दीन डुमरियागंजमधून रिंगणात आहेत.
मैनपुरीतून उमेदवार बदलला BSP Candidate List ।
याशिवाय पक्षाने बांदा येथून मयंक द्विवेदी आणि जौनपूरमधून धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांनाही तिकीट दिले आहे. बसपाने मैनपुरीमधूनही आपला उमेदवार बदलला आहे. आता येथून शिवप्रसाद यादव लढणार आहेत. मायावतींनी बरेलीमधून छोटेलाल गंगवार, सुलतानपूरमधून उदराज शर्मा, फारुखाबादमधून क्रांती पांडे, गाजीपूरमधून उमेश कुमार सिंह आणि बलियामधून लल्लन सिंह यादव यांना तिकीट दिले.
आतापर्यंत किती मुस्लिमांना तिकीट दिले? BSP Candidate List ।
बहुजन समाज पक्षाने आतापर्यंत एकूण 14 मुस्लिम उमेदवारांवर मैदानात उतरवलंय. गेल्या 4 याद्यांमध्ये पक्षाने 11 उमेदवारांना तिकीट दिले होते. पक्षाने सहारनपूरमधून माजीद अली, मुरादाबादमधून इरफाम सैफी, रामपूरमधून जीशान खान, संभलमधून शौकल अली आणि अमरोहामधून मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी दिली आहे.
याशिवाय बसपने आमलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनीस अहमद, कन्नौजमधून इम्रान, लखनऊमधून सरवर मलिक, एटामधून मोहम्मद इरफान आणि गोरखपूरमधून जावेद सिमनानी यांना तिकीट दिले आहे.
यूपीमध्ये कधी होणार मतदान?
यावेळी उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. येथे पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यासाठी २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी आणि पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्याचवेळी, उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे, तर सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.