Arjun Kapoor Post| अभिनेता अर्जुन कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्याच्या अभिनया पेक्षा अर्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. अनेकदा सोशल मीडियावर अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगलेल्या असतात. सध्या त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टद्वारे तो आईच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
अर्जुनची आई मोना कपूर यांचे २५ मार्च २०१२ साली निधन झाले. सोमवारी त्यांना जाऊन १२ वर्षे झाल्याने आईच्या आठवणीत भावुक झालेल्या अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आई आणि बहिणीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
अर्जुन कपूरची पोस्ट Arjun Kapoor Post|
सोबतच त्याने लिहिले की, “वेळ निघून जाते, असं लोक म्हणतात…पण, हे खरं नाही. १२ वर्ष झाली आणि आजही हा दिवस मला आवडत नाही. तुझ्याबरोबर आता फोटो काढता येणार नाही हे फिलिंग आणि सत्य मला आवडत नाही. मला आई बोलता येणार नाही, याचा द्वेष येतो. माझ्या फोनवर आईचा कॉल येणार नाही. तुला आमच्यापासून हिरावून नेलं. याचा तिरस्कार येतो.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की,” मी ठीक आहे, हे दाखवण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पण, माझं आयुष्य तुझ्याविना अपूर्ण आहे. मी तुला खूप मिस करतो. तू आम्हाला सोडून गेली नसतीस तर गोष्टी वेगळ्या असत्या, मी वेगळा असतो. कदाचित माझ्या मी जास्त आनंदी असतो. तू जिथे कुठे असशील तिथे हसत राहा. कारण, तुझ्याशिवाय हसणं आणि जगणं मला कठीण जात आहे.” असे म्हणत अर्जुनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी 1983 साली मोना कपूर यांच्याशी लग्न केले पण, लग्नानंतर 16 वर्षांनी घटस्फोट घेऊन ते विभक्त झाले. अर्जुन हा बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरा विवाह केला होता. जान्हवी आणि खुशी कपूर या श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुली आहेत. जान्हवी कपूरने देखील सिनेसृष्टीत करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
हेही वाचा:
‘गुड न्यूज’ कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापट म्हणाली…