“सतत प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारा…” ; आसामच्या मुख्यमंत्र्यांवर असदुद्दीन ओवेसी संतापले ?, नेमकं कारण काय वाचा

Asaduddin Owaisi on Himanta। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात रोज शाब्दिक युद्ध होताना दिसून येते. त्यातच पुन्हा एकदा या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीय. यावेळी हिमंताच्या एका वक्तव्यावर ओवेसींचा संताप झालाय. हिमंता यांनी बंगाली मुस्लिमांबाबत विधान केले होते, त्यावरूनच ओवेसींनी बिसवा यांच्यावर सडकून टीका केलीय.
स्थलांतरित मुस्लिमांना “स्वदेशी” म्हणण्यात अडचण नाही पण… Asaduddin Owaisi on Himanta।
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की “त्यांच्या सरकारला स्थलांतरित मुस्लिमांना “स्वदेशी” म्हणण्यात कोणतीही अडचण नाही, जोपर्यंत ते बालविवाह, बहुपत्नीत्व संपवत नाहीत आणि त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. “असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. आता हिमंता यांचे हे विधान ओवेसी यांना फारसे रुचले नाही. यावरून त्यांनी हिमांता बिस्वा यांच्यावर टीका केली
बंगाली भाषा बोलणाऱ्या मुस्लिमांना मियाँ मुस्लिम म्हणतात. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “बंगाली भाषिक मुस्लिम आधीच भारतात ‘स्वदेशी’ आहेत.
सतत प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारा Asaduddin Owaisi on Himanta।
ओवेसी यांनी हिमंता यांचावर निशाणा साधत, सतत प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारा मी नाही. धर्मांधता आणि वर्णद्वेषाचे हे फक्त प्रदर्शन आहे. असे म्हणत बिसवा यांचयवर टीका केली. उल्लेखनीय आहे की, हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की त्यांच्या सरकारला स्थलांतरित मुस्लिमांना “स्वदेशी” म्हणण्यात कोणतीही अडचण नाही, जोपर्यंत ते बालविवाह, बहुपत्नीत्व संपवत नाहीत आणि त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. ” असे विधान त्यांनी केले होते.
हेही वाचा
“…पण त्या दीड लाख मुस्लिमांचे काय होणार?” ; CAA वरून ओवेसींचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांच्यावर हल्लाबोल
AIMIM कडून उमेदवारांच्या नावांची घोषणा ; ओवेसी म्हणाले,”पक्ष मला तिकीट…”





