पुणे – हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला रिव्हु देण्याचे टास्क देऊन ७१ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथील व्यक्तीला न्यायालयाने दणका दिला आहे.
त्याने केलेला जामिनाचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.नरावडे यांनी फेटाळला. विकास सत्यनारायणव्यास पारीक (वय २९, रा. राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह एकुण १२ जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२३ मध्ये ही घटना घडली. व्हॉट्सअप आणि टेलिग्रॉमद्वारे टास्क देऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पारीक याला हिंजवडी पोलिसांनी १९ ॉक्टोबर २०२३ रोजी अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला.
यास अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी विरोध केला. लोकांची ऑनलाईन फसवणूक करणारी ही टोळी आहे. त्याने बऱ्याच ठिकाणी असे गुन्हे केले आहेत. अशा प्रकारे आणखी लोकांची फसवणूक झाल्याचे शक्यता आहे. त्याच्यावर पालघर जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे.
फिर्यादीच्या गुन्ह्यातील रक्कम ७१ लाख ८२ हजार रुपये अद्याप जप्त करायचे आहेत. तो मूळचा राजस्थान येथील आहे. जामीन झाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यामुळे जामीन नाकारण्याची मागणी ॅड. पवार यांनी केली.