Jui gadkar । अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे घरोघरी पोहचली. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेसोबतच ती ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुझविन सख्या रे’ यामध्ये दिसली आहे. मधल्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे. जुई सोशल मीडियावर सक्रिय असून प्रेक्षकांशी नेहमीच आपल्या लाईफचे अपडेट शेअर करत असते.
View this post on Instagram
अशात जुईने वृत्तमाध्यमाला दिलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुईचे अभिनयासोबत पर्सनल लाईफ अनेकदा चर्चेत असते. अशात एका मुलाखतीत जुईने तिच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे.
जुईला मुलाखतीत वैयक्तिक आयुष्या प्रश्न विचारण्यात आले यावर तिने अनेक खुलासे केले. लग्नाच्या प्रश्नांवर जुई म्हणाली, ‘मला अनेकदा लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. मला मान्य आहे, माझ्या लग्नाला उशीर झाला आहे. माझं लग्न कधी होणार मुलं-बाळं कधी होणार, हे सगळे प्रश्न माझ्याही मनात येतात. मग त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. ती पुढे म्हणाली, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे माझं लग्न व माझं सगळं पुढचं आयुष्य हेसुद्धा त्याच्या मर्जीनुसारच घडणार आहे. असं म्हणत तिने या प्रश्नावर उत्तर दिल तिच्या हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. यावर आता चाहते सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
हे वाचाल का ? हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह दिला ‘राजीनामा’