Oscars Awards 2024| मनोरंजनविश्वातील महत्त्वाचा समाजला जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा 96व्या अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे. नुकतीच ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2023मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला ओपनहायमर सिनेमा यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. याशिवाय विविध पुरस्कारांवर ओपनहायमर या सिनेमाने नाव कोरलं आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, सहायक्क अभिनेता आणि दिग्दर्शक याबरोबरच ओरिजनल स्कोअर, सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग या कॅटेगरीतही ओपनहायमरला ऑस्कर मिळाला आहे. या सोहळ्यात किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. Oscars Awards 2024|
तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ‘पूअर थिंग्ज’मधील तिच्या अभिनयासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना 96व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
#Oscars: “Oppenheimer” wins best picture https://t.co/zBZiywMm1Q pic.twitter.com/tZ5syNYJfh
— Variety (@Variety) March 11, 2024
याबरोबरच ओपनहायमरमधील भूमिकेसाठी रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर ‘ओपनहायमर’ चित्रपटाला मिळाला आहे. ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर जिंकला. Oscars Awards 2024|
तर सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ‘पुअर थिंग्ज’ ची डिझायनर होली वॉडिंग्टनला ऑस्कर देण्यात आला. ऑस्कर 2024 मध्ये ओपनहायमर, पुअर थिंग्ज आणि बार्बी या सिनेमाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.
हेही वाचा: