पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी यांनी अभिवादन केले.
यावेळी प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, मुख्य वसतिगृह प्रमुख प्रा. वर्षा वानखेडे, महिला वसतिगृह प्रमुख प्रा. तल्लत, अधिसभा सदस्य प्रा. राजेंद्र घोडे, मुकूंद पांडे, माजी अधिष्ठाता डॉ. दीपक माने यांनीही पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.