Morbi Medical College Accident । गुजरातमधील मोरबी या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे चार जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन मदतीसाठी येथे पोहोचले.बचाव कार्य हाती घेण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
एक वृत्तसंस्थेनुसार, नव्याने बांधलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीत हा अपघात झाला. अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे.
भाजप नेत्यांनी याविषयी सांगताना,स्लॅब तुटल्याने 3-4 जण जखमी झाले असून ही दुर्दैवी बाब आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी करू असे ते म्हणाले.
#WATCH | Devendra Singh Jadeja, Fire Officer, Morbi says, ” Around 8 pm, a call was received at the Fire station that a side slab of a new Medical College, that is being constructed, has collapsed…our team reached the spot and rescued 4 people. One person was still trapped,… https://t.co/sxUoAoThkZ pic.twitter.com/4kJBdwY2IB
— ANI (@ANI) March 8, 2024
अग्निशमन दलाची तातडीने कारवाई Morbi Medical College Accident ।
अग्निशमन अधिकारी देवेंद्र सिंह जडेजा म्हणाले, ‘रात्री 8 वाजता अग्निशमन केंद्रावर कॉल आला की बांधण्यात येत असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा बाजूचा स्लॅब कोसळला आहे. आमची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि चार जणांना वाचवण्यात यश आलं. एक व्यक्ती अडकला होता, ज्याचा चेहरा दिसत होता आणि त्याचे संपूर्ण शरीर स्लॅब आणि काँक्रीटमध्ये अडकले होते. त्याने सांगितले की, ‘आम्ही त्याला पहाटे तीनच्या सुमारास वाचवले आणि हॉस्पिटलमध्ये रेफर केले.’
#WATCH | Gujarat: A slab of a newly constructed Medical College, collapsed in Morbi. Rescue operation underway. More details awaited. pic.twitter.com/0kWMaWrAhp
— ANI (@ANI) March 8, 2024
मोरबी पूल अपघाताचा 130 हून अधिक लोकांचा मृत्यू Morbi Medical College Accident ।
यापूर्वी, मोरबी येथे 30 ऑक्टोबर 2022 रोजी एक अतिशय गंभीर अपघात झाला होता, जेव्हा एक झुलता पूल कोसळला होता. या अपघातात 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 180 हून अधिक लोक जखमी झाले. 19व्या शतकातील पूल दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला होता. त्यावेळी दिवाळी आणि गुजराती नववर्ष असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ होती.
हेही वाचा
Gujarat Election Result 2022 : पूल कोसळून 135 जणांचा बळी गेलेल्या मोरबीमध्ये भाजपचा मोठा विजय