Amol Kolhe on Ajit Pawar। आगामी लोकसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटाकडून शिरूरच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. त्यातच पक्षाकडे उमेदवार नसतो त्यावेळी आम्ही कलाकारांना पुढे करतो अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली होती. त्याच टीकेला आता अमोल कोल्हे यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला Amol Kolhe on Ajit Pawar।
अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी, शिरूर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कटीबद्ध राहीन असे म्हटले. तसेच अजित पवार मला सेलिब्रिटी उमेदवार म्हणून हिणवत आहेत. तसेच सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक होती असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, धर्मेंद्र या कलाकारांची उदाहरणं दिली. परंतु, मी एक गोष्ट सांगतो की, अजित पवारांनी ज्यांची उदाहणं दिली त्यातल्या एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा
“अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली” – अजित पवार
लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? Amol Kolhe on Ajit Pawar।
खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल, आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?
तसेच अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, मला त्यांना विचारायचं आहे की, या काळात मी संसदेत कधी अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? एक गोष्ट मी आवर्जून नमूद करेन की. तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या संसदीय कामगिरीपेक्षा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी म्हणून हिणवता त्या अमोल कोल्हेची कामगिरी कायमच उजवी राहिली आहे. हवं तर रेकॉर्ड तपासून पाहा.