Devendra Fadanvis on alliance with Uddhav Thackeray – उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आम्हाला मित्र मानतात का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. आमच्या नेतृत्वाला सतत शिव्या घालणाऱ्या व्यक्तींसोबत आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकू असे वाटत नाही, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याशी आमचे आधीपासून चांगले संबंध होते. माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले आहे. मोठ्या प्रकल्पांवर आम्ही एकत्र काम केले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयातही त्यांनी विरोध केला होता. | Devendra Fadanvis on alliance with Uddhav Thackeray
विशेष म्हणजे, शिवसेना-भाजप सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी ते प्रयत्न करत होते. परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे मविआ सरकार स्थापन झाल्या पहिल्या दिवसापासूनच शिंदेंच्या मनात अस्वस्थता होती. सरकारमध्ये जाणं ठीक आहे, पण आपले विचार, तत्त्व, भूमिका एवढी पूर्णपणे बदलणे शिवसेनेतील एका गटाला पटत नव्हते.
उद्धव ठाकरेंना देखील ते वैतागले होते. ही आलेली संधी आम्ही सोडणार नव्हतोच, शिवाय जनादेशही आमच्या बाजूनेच होता. त्यामुळे आम्ही युती केली आणि सरकार स्थापन केले, असे फडणवीस यांनी सांगितले. | Devendra Fadanvis on alliance with Uddhav Thackeray