huma qureshi । बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. या हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. हुमाच्या ‘महाराणी’ या वेबसिरीजचे दोन्ही सीझन लोकांना खूप आवडले.
राजकीय नाट्याने भरलेल्या हुमा कुरेशीच्या या वेब सिरीजचे प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते. मात्र आता ‘महाराणी ३’ची प्रतीक्षा संपली आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला
ट्रेलरमध्ये राणी भारतीच्या भूमिकेत हुमा कुरेशी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येण्यासाठी सज्ज झाली आहे. जनतेवर आणि स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी राणी भारती पुन्हा एकदा परतली आहे.
महाराणी 3 चा ट्रेलर रिलीज करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘बंदुका दुर्बल लोक वापरतात, पण शहाणे मनाने वापरतात. महाराणी ३ मध्ये राणीचा बदला पहा. राणी भारती तुरुंगात असून ती आता अशिक्षित राहिलेली नाही, असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे बाहेरच्या जगात राजकारण सुरू आहे. अर्धा बिहार राणीचा शत्रू झाला आहे. राणीच्या मुलांवर हल्ला होतो आणि विषारी दारूमुळे लोक मरतात.’
सोनी लिव्हवर ‘महाराणी’चे दोन सीझन रिलीज झाले आहेत. आता या मालिकेचा तिसरा सीझनही सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. ‘महाराणी ३’ ७ मार्चला प्रदर्शित होत आहे. ‘महाराणी 3’ च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असून, अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कानी कुसरुती यांच्याही विशेष भूमिका आहेत. याशिवाय अनुजा साठे, सुशील पांडे, दिव्येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.