Imtiaz Jalil Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी यासंबंधीची आपली इच्छा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे बोलून दाखवली आहे. त्यांची ही विनंती ओवेसी यांनी मान्य केली. तर एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेसाठी नवा उमेदवार शोधावा लागेल.
जलील म्हणाले की, संभाजीनगरमधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला, तरी तो निवडून येईल.मुंबईच्या एमआयएम कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील एमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही मला मुंबईतून लढवावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. | Imtiaz Jalil Lok Sabha Election
मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यास तयार आहे हे मी अजून सांगणार नाही. पण आम्ही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून १८ तारखेला होणाऱ्या बैठकीत ओवेसी काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर धुळे, मालेगाव सह विदर्भातील २ मतदारसंघात आम्ही तयारी करत आहोत. मी जरी मुंबईतून निवडणूक लढवली तरी संभाजीनगरात खूप उमेदवार आहेत जे निवडून येतील असे त्यांनी म्हटले आहे. | Imtiaz Jalil Lok Sabha Election
संभाजीनगरमध्ये विजय निश्चित
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना ३८९,०४२ तर शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना ३,८४,५५० मते मिळाली होती. त्यांचा ४,४९२ मतांनी विजय झाला होता. यावेळी शिवसेना फुटीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन उमेदवारांमुळे आपली जागा निवडून येईल असे कयास एमआयएमचा आहे. त्यातूनच संभाजीनगर मधून एमआयएमचा कोणीही व्यक्ती उभा केला तरी निवडून येईल असे जलील यांनी म्हटले आहे. | Imtiaz Jalil Lok Sabha Election