Manoj Jarange Health। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यातच त्यांनी सरकार आपली मागणी मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण करणार असे म्हटले. त्यातच यावेळी ‘मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा…’, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या. त्यानुसार आज त्यांनी उपचारास होकार दिला आहे.
मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिलाय. जरांगेनी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरुन उपचारांना होकार दिला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास होकार Manoj Jarange Health।
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केले. पण गुरुवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. अशक्तपणामुळे जरांगेंना ग्लानी आली. जरांगेंना पाणीही गिळता येत नव्हतं. एवढं असतानाही जरांगे उपचार आणि पाणी घेण्यास मनाई करत होते, त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात तक्रार दिली. यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले.
सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम Manoj Jarange Health।
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; म्हणाले,”जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना…”