Balu Mama Sheep Program सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे आता नांदेडच्या लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळू मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. तेथे मंगळवारी एकादशी असल्याने महाप्रसादात उपवसासाठी भगर करण्यात आली होती.
मिळलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमातील जवळपास 1 हजार लोकांना भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात कोष्टवाडी ,सावरगाव ,हरणवाडी ,पेंडु ,सादलापुर या गावासह परिसरातील जवळपास 1 हजार लोक उपस्थित होते. यावेळी अनेक लोकांना भगर खाल्यामुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.
यावेळी अनेकांना नांदेड जिल्हा रुग्णालय , लोहा ग्रामीण रुग्णालयसह विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, निम्म्या रुग्णांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.