पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
महेश जाधव
मायणी – हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी “पटेरी हंस”हा पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या येरळवाडी (ता.खटाव, सातारा) येथील तलावामध्ये दाखल झाला असून हा “पटेरी हंस” जगातील सर्वात जास्त उंच उडणाऱ्या पक्षांमधील एक पक्षी असून तशी त्याची नोंद आहे. या पटेरी हंसाचे येरळवाडी येथील तलावात आगमन झाले असून पक्षी प्रेमींना आनंद झाला आहे.
नुकतीच फ्लेमिंगोनेही डिसेंबर महिन्याच्या अखेरीला हजेरी लावली होती आता मायणी समूह पक्षी संवर्धन असलेल्या मायणी, सुर्याचीवाडी, कानकात्रे येथील तलावातही हे पक्षी हजेरी लावतील अशी आशा पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी यांनी व्यक्त केली आहे.
पटेरी हंस(बार-हेड हंस) याचे दक्षिण आशियातील पर्वतीय तलावात वास्तव्य असते तो भारतात थंडीची चाहूल लागल्यानंतर स्थलांतरित करतो आणि मध्य आशियात प्रजनन करतो,अगदी दक्षिणेकडील दक्षिण भारतापर्यंत. हे घरट्यात एकावेळी तीन ते आठ अंडी देतात. हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून त्याला ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे.
पटेरी हंस(बार-हेड हंस) हिमालय पर्वतावर दक्षिण आशियाच्या काही भागात (आसाम ते तमिळनाडूच्या दक्षिणेस दक्षिण भागात) हिवाळा घालवण्यासाठी स्थलांतर करतात.हे पक्षी मुख्यत्वे तिबेट पठारावर घरटी करतात. हा पक्षी प्रेमळ आहे आणि इतर पक्ष्यांना त्रास देत नाही.
या आठवड्यात थंडी चाहूल सुरू झाल्याने हे पटेरी हंस येरळवाडी तलावात दाखल झाले असून पक्षीप्रेमी,निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मायणी पक्षी आश्रयस्थानाला “मायणी समूह पक्षी संवर्धनाचा” दर्जा दिला असून यामध्ये मायणी, येरळवाडी,कानकात्रे येथील तलाव व वनक्षेत्राचा समावेश केला असून या भागात प्रतिवर्षी स्थलांतरित पक्षी येत असतात त्यामुळे पक्षी प्रेमींना वेगवेगळे पक्षी पाण्याचा आनंद होत असतो येत्या नजीकच्या काळात मायणी समूह पक्षी संवर्धनाचा विकास होऊन पर्यटन क्षेत्र होण्यास मदत होणार आहे.
हिमालय ओलांडताना स्थलांतर करणारा व जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणून “पटेरी हंसला” ओळखले जाते. हिमालय ओलांडण्यापूर्वी ही प्रजाती तिबेट, कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया येथून दक्षिणेकडे गेल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे हा पटेरी राजहंस आपले खाद्य तलावाकडील असलेल्या गवतामध्ये शोधतात.