सातारा : शंभराव्या नाट्यसंमेलनाचा नाट्यजागर आज सातारच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात उत्साहात सुरु झाला. पूर्व सत्रात जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यानंतर झालेल्या बालनाट्य स्पर्धेत थिएटर मुव्हमेंटच्या विभावरी देशपांडे लिखित आणि चैतन्य पाटेकर दिग्दर्शीत “जंबा बंबा बू” ने प्रथम क्रमांक पटकावला.
नाट्यजागरच्या उदघाटन प्रसंगी शिरीष चिटणीस, राजेश कुंभारदरे, आनंद उर्फ बाळू कदम, अभिनेते बाळकृष्ण शिंदे, डी. बी. गायकवाड, संजय दस्तुरे, विश्वास धुमाळ, रोहन नंदवंशी हे मान्यवर उपस्थित होते.
दिवसभराच्या सत्रात शिरवळ, खंडाळा, कोरेगाव, वाई, सातारा येथून सहभागी झालेल्या एकूण तेरा बालनाट्यांचे उत्साहात सादरीकरण झाले. तेरा पैकी दोन बालनाट्यांची सांगली येथे होणाऱ्या होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी निवड झाली. पैकी थिएटर मुव्हमेंटच्या विभावरी देशपांडे लिखित आणि चैतन्य पाटेकर दिग्दर्शीत जंबा बंबा बू ला प्रथम क्रमांक रोख रक्कम 10 हजार रुपये व प्रमाणपत्र तर अभिव्यक्त निर्मित धनंजय सरदेशपांडे लिखित आणि सारिका जाधव दिग्दर्शीत चम चम चमको ला द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7 हजार 500 व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
या दोन्ही बालनाट्यात अनुक्रमे ईश्वरी बोडस, स्वरा कदम, गार्गी हंगेकर, परिणिता जंगम, निहा पवार, वज्र पवार, आयान नलावडे, अथर्व गाडे, उमर मुजावर, अभिनव कारंडे, शर्व बोडस, आराध्य हेंद्रे तर श्रद्धा जाधव, सृष्टी दणाणे, शरण्या पवार, ईशवरी काशीकर, हरप्रित बिग्वा, ईशान टोपे, प्रारब्ध कांबळे, शाश्वत भोसले या बालकलावंतांनी आपलं सादरीकरण केलं. सातारा विभाग प्रमुख संदीप पाटील, तुषार भद्रे, रवींद्र डांगे, संदीप जंगम, शेखर कुलकर्णी, राजीव मुळ्ये आदी मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.