बाली – भारतीय क्रिकेट संघटनेचे(बीसीसीआय) सचिव जय शहा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी कायम राहतील. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जय शहा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी एकमताने वाढवण्यात आला. एसीसीची वार्षिक सर्वसाधारण इंडोनेशिया येथे मंगळवारपासून सुरू झाली, जिचा बुधवारी समारोप झाला. जय शहा यांनी २०२१ मध्ये बांगलादेशच्या नझमुल हसन यांच्या जागी या पदाची सूत्रे हाती घेतली होती.
वार्षिक बैठकीत आशियातील सर्व क्रिकेट मंडळांचे सदस्य सहभागी झाले होते. यामध्ये एसीसी मीडिया हक्कांबाबतही निर्णय घेण्यात येणार होता, मात्र हा निर्णय झाला आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ज्या अंतर्गत आशिया करंडकसारख्या मोठ्या स्पर्धेचे प्रसारण केले जाते. यामध्ये अंडर-२३, अंडर-१९ आणि महिला आशिया करंडकाचे सामनेही दाखवण्यात आले आहेत.
सध्या, डिस्ने प्लस हॉटस्टारकडे डिजिटल अधिकार आहेत आणि स्टारकडे टीव्हीचे अधिकार आहेत. स्टारने ८ वर्षांपूर्वी हक्क विकत घेतले होते. मीडिया हक्कांच्या लिलावासाठी एसीसीने सर्व शीर्ष प्रसारकांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले आहे.
आशिया करंडक स्पर्धेच्या पुढील ठिकाणाबाबतही या बैठकीत निर्णय होणार होता. आता आशिया करंडक २०२५ मध्ये होणार आहे, जो टी-२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. यूएई आणि ओमान या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत. २०२३ आशिया करंडक पाकिस्तानने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये आयोजित केला होता, जो भारताने जिंकला होता.
यूएई आणि ओमानला आशिया करंडकाचे यजमानपद मिळण्याची आणखी एक समस्या आहे. केवळ पूर्ण सदस्य आशियाई मंडळालाच स्पर्धेचे यजमान हक्क मिळतात आणि दोन्ही देश सहयोगी राष्ट्रे आहेत. २०१८ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा यूएई मध्ये खेळली गेली असली तरी, भारत आणि श्रीलंकेकडे तेव्हा यजमानपदाचे अधिकार होते. अशा परिस्थितीत, होस्टिंगचे अधिकार केवळ पूर्ण सदस्य मंडळाकडेच राहतील.
१९८३ मध्ये एसीसीची स्थापना
एसीसीची स्थापना १९८३ मध्ये झाली. आशिया खंडात क्रिकेट खेळाचा विकास करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. सध्या 25 देश एसीसीचे सदस्य आहेत.