पुणे :– मणिपूरच्या महिला संघाने तीन गटांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवताना येथे सुरू झालेल्या ४१व्या वरिष्ठ व २५व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत वर्चस्व गाजवले.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग संकुलात सूरू असलेल्या या स्पर्धेत सर्व्हिसेस आणि सेना दलाच्या पुरूष संघांनी विविध गटांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. मणिपूरच्या पूनम व रुक्मिणी यांनी ८.२९.०३ सेकंदात अंतिम फेरी गाठताना लाईट वेट डबल स्कल्स स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.
तर, कॉक्सलेस पेअर्स गटात गुरबानी व दिलज्योत या कौर बहिणींनी ०९.१६.०४ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी बजावली. डबल स्कल्स पेअर्स स्पर्धेत थांगजाम प्रिया देवी व हाओबजाम देवी यांनी ०८.४६.०६ सेकंदात अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने सिंगल स्कल्स विभागात ०९.४०.०६ सेकंदात उपांत्य फेरी गाठताना पदकाच्या आशा कायम राखल्या.
पुरुष विभागात यजमान सर्व्हिसेस संघाने पाच गटात आर्मी संघाने तीन गटात अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत हांगझाऊ आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक विजेता सर्व्हिसेसचा जसविंदर भीमा, पूनित आशिष या संघाने सहजपणे अंतिम फेरी गाठली. तसेच सेना दलाच्या संघाने कोक्सलेस एटस, डबल स्कल्स, लाईट वेट डबल स्कल्स, क्वाड्रापल स्कल्स, सिंगल स्कल्स या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.
National Rowing Championships 2024 : सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाची आगेकूच…
तर, गतविजेत्या सलमान खान याने ०८.३२.०१ सेकंद वेळ नोंदवत उपांत्य फेरीत गाठताना सुवर्ण पदकाच्या आशा कायम ठेवल्याने सेना दलाच्या बाबू लाल यादव आणि लेखराम यांना कॉक्सलेस पेअर्स गटात ०७.५६.०२ सेकंदात अंतिम फेरी गाठताना कोणाचाही प्रतिकार झाला नाही.
बलराज अंतिम फेरीत
बलराज पणवर आणि दत्तू भोकनळ यांच्यात या दोन ऑलिंपिक पटू मध्ये झालेली शर्यत आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली. बलराजने दत्तू भोकनळचे आव्हान मोडून काढताना सिंगल स्कल्स विभागात अंतिम फेरीत धडक मारली.