INS Sumitra : भारतीय नौदलाचे धाडस पुन्हा एकदा अरबी समुद्रात पाहायला मिळाले. अरबी समुद्रात २४ तासांत भारतीय नौदलाने दोन जहाजांना चाच्यांपासून वाचवले. एवढेच नाही तर नौदलाने एका जहाजातून 19 पाकिस्तानी क्रू मेंबर्सची तर दुसऱ्या इराणी जहाजातून 17 क्रू मेंबर्सची सुटका केल्याची कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे.
भारतीय नौदलाने 28 आणि 29 जानेवारी रोजी अरबी समुद्रात दोन जहाजांचे अपहरण होण्यापासून वाचवले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्रा यांनी रविवारी प्रथम इराणी जहाज एफबी इराणचे अपहरण होण्यापासून वाचवले. यानंतर अरबी समुद्रातच विशेष ऑपरेशन राबवून अल नैमी नावाच्या जहाजाला सोमालियाच्या चाच्यांपासून वाचवण्यात आले. या कारवाईत भारतीय मरीन कमांडोनी भाग घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आयएनएस सुमित्राने पायरसीविरोधी दुसरे यशस्वी ऑपरेशन केले. या ऑपरेशनमध्ये 19 क्रू मेंबर्स आणि जहाज सशस्त्र सोमाली चाच्यांपासून वाचवण्यात आले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी, हिंद महासागर प्रदेशात चाचेगिरी विरोधी ऑपरेशन्सवर तैनात केलेली जहाजे सर्व खलाशांच्या सुरक्षेची बांधिलकी दर्शवतात, असे म्हटले आहे.
INS Sumitra carries out 2nd successful Anti Piracy Ops – Rescuing 19 crew members and vessel from armed Somali pirates.
Indian Naval Ship Sumitra, having thwarted the piracy attempt on FV Iman, has carried out yet another successful anti-piracy operation off the East Coast of… pic.twitter.com/sHVJQIeSDG
— Press Trust of India (@PTI_News) January 30, 2024
महिनाभरात आणखी एका जहाजाची सुटका
भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांनी लक्ष्य केलेल्या मासेमारी जहाजांची सुटका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदर 5 जानेवारी रोजी, INS चेन्नईने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका जहाजाच्या क्रूची यशस्वीरित्या सुटका केली आणि जहाजावरील सर्व 15 भारतीय नागरिकांची सुटका केली. 15 भारतीय क्रू मेंबर्सनी एमव्ही लीला नॉरफोक या मालवाहू जहाजाची चाच्यांपासून सुटका केली होती. हे ऑपरेशन मरीन कमांडोज (MARCOS) ने केले.
…त्यामुळे भारतीय नौदल सक्रिय
अलीकडेच भारतीय नौदलाने अरबी समुद्रात चाच्यांचे वारंवार होणारे हल्ले पाहता पाळत वाढवली आहे. या आठवड्यात, नौदलाने सांगितले होते की, ते उत्तर आणि मध्य अरबी समुद्रातील मासेमारी जहाजे आणि इतर जहाजांमधील लोकांची व्यापक तपासणी करेल. इस्रायल-हमास संघर्षाच्या दरम्यान, लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हुथी दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नौदलाने आपली दक्षता वाढवली आहे.
गेल्या वर्षीही भारतीय जहाजाला केले लक्ष्य
23 डिसेंबर रोजी भारतीय क्रू सदस्यांना घेऊन जाणाऱ्या लाइबेरियन ध्वजांकित MV केम प्लूटो, 21 वर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ड्रोनने हल्ला केला. त्याच दिवशी दक्षिण लाल समुद्रात भारताकडे जाणाऱ्या आणखी एका व्यावसायिक तेलाच्या टँकरला लक्ष्य करण्यात आले ज्यामध्ये 25 भारतीय क्रू मेंबर्सची टीम होती, या जहाजाला संशयित ड्रोन हल्ल्याचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त, 14 डिसेंबर रोजी दुसऱ्या घटनेत, समुद्री चाच्यांनी माल्टा-ध्वज असलेल्या एमव्ही रौनचे अपहरण केले.