Khalistani Terrorist Pannun : अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा या महिन्यात 22 जानेवारीला पार पडणार आहे. याची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र याच दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पन्नू यांनी मुस्लिमांना या समारंभाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्याने एक व्हिडो शेअर केला आहे. त्यात त्याने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अमृतसर ते अयोध्येपर्यंतचे विमानतळ बंद करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
पन्नूने त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये राममंदिर लोकार्पण सोहळ्याविषयी प्रक्षोभक विधान केले आहे. या व्हिडिओत त्याने मुस्लिमांनो, आता तुमच्यावर भारतात उर्दूस्थान निर्माण करण्याची वेळ आली आहे. 22 जानेवारीला मोदींचे मुस्लिमांविरुद्ध ऑपरेशन ब्लूस्टार आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लूस्टार सुरू करण्यात आले होते. या कारवाईत दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले मारला गेला. त्याचेच उदाहरण पन्नूने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.
अयोध्या में प्रभु श्री राम के स्वागत को लेकर पूरा देश राममय है। राम लला की भक्ति में डूबे भक्तजन इस शुभ दिन के लिए तरह-तरह से अपनी भावनाएं प्रकट कर रहे हैं। भगवान श्री राम को समर्पित हंसराज रघुवंशी जी का ये भजन सुनिए… #ShriRamBhajan https://t.co/kDSO8SNzxW
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2024
पन्नू भारताला आपला शत्रू मानतो. पन्नूवर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये पन्नूला UAPA च्या कलमांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यात 3 हजार व्हीव्हीआयपींचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर अनेक भजने पोस्ट केली आहेत.