संतोष कोकरे
ठोसेघर – कास पठारावर असणारी निसर्गाची अद्यभूत रूपे ,गुहा, तळी तसेच काही रहस्यमय ठिकाणे पाहण्याची संधी पर्यटकांना कास पठार समिती आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने बारमाही निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या ठिकाणी बऱ्याच पर्यटकांनी भेट देऊन कास पठारावरील दिसणारी निसर्गाचे विविध रूपे तसेच रहस्यमय ठिकाणे पाहून समाधान व्यक्त केले आहे.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर फुलणारी विविध प्रजातीची फुले पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटक या फुलांच्या पंढरीला भेट देत असतात. या ठिकाणी दुर्मिळ वनस्पती बरोबरच निसर्गाची रुपे अनेक आविष्कार ही पाहायला मिळतात. पठारावरील फुलांचा हंगाम संपल्यानंतर कास पठार कार्यकारी समिती कास पठारावर बारमाही पर्यटन सुरू राहावे यासाठी वन विभागाच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे.
त्याचाच एक भाग म्हणून कास पठारावर असणारी निसर्गाची अद्यभूत रूपे ,गुहा, तळी तसेच काही रहस्यमय ठिकाणे पाहण्याची संधी पर्यटकांना कास पठार समिती आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने बारमाही निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या ठिकाणी बऱ्याच पर्यटकांनी भेट देऊन कास पठारावरील दिसणारी निसर्गाचे विविध रूपे तसेच रहस्यमय ठिकाणे पाहून समाधान व्यक्त केले आहे.
कास पठार कार्यकारी समितीने वनविभागाच्या सहकार्याने कास पठारावर निसर्ग पर्यटन सुरू केले आहे. निसर्ग पर्यटनात सुरू केलेले पॉईंट पायी चालत अथवा जीप सफारीतून सुद्धा अनुभवता येते. जीप सफारीतून दिसणारी निसर्गाची अदभुत सफर आणि त्यात दरयाखोऱ्याची माहिती असणारे अनुभवी गाईड यामुळे जीप सफारीत बसून पर्यटक निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवत आहेत. कास पठार समितीचे अनुभवी गाईड पर्यटकांना योग्य ती माहिती देत असल्यामुळे एक रोमांचक सफर घडत आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील हे पॉइंट पर्यटकांसाठी निसर्ग भटकंतीची एक पर्वणीच असून यामुळे या निसर्ग पर्यटनामुळे या परिसरात पर्यटनाचे नवीन दालन खुले झाले आहे. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असून हा निसर्ग अविष्कार चा आनंद पर्यटन प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे
कस परिसर निसर्ग सौंदर्याने समृद्ध
आम्ही काल लोणावळ्याला पर्यटनासाठी भेट दिली होती. त्या ठिकाणच्या पॉईंट पेक्षा कास पठारावरील पॉईंट पाहून समाधान वाटले. पठारावरील गाईडने आम्हाला परिसराची व पॉईंट्सची उत्तम प्रकारे माहिती दिली. कास पठारावरील वातावरण आल्हाददायक आहे. त्याचबरोबर हा परिसर निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे.
संतोष पाटील, पर्यटक, ठाणे