नवी दिल्ली – दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणात धुके पसरत असून त्यामुळे दिल्ली व उत्तर भारतातील रेल्वे तसेच विमान वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वेने माहिती दिली की धुक्यामुळे १४ रेल्वे गाड्यांना कमालीचा विलंब झाला.
दिल्लीत उशिरा येणाऱ्या गाड्यांमध्ये पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्सप्रेस, हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्सप्रेस, कानपूर-नवी दिल्ली श्रमशक्ती, अलाहाबाद-नवी दिल्ली प्रयागराज, आझमगड-दिल्ली कैफियत एक्सप्रेस, भागलपूर-आनंद विहार विक्रमशिल्ला, गया-नवी दिल्ली मगध या गाड्यांचा समावेश आहे.
एक्सप्रेस, दिब्रुगड-नवी दिल्ली राजधानी, दुर्ग-निजामुद्दीन संपर्कक्रांती, चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्सप्रेस, हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा, हबीबगंज-नवी दिल्ली भोपाळ एक्सप्रेस, खजुराहो-कुरुक्षेत्र एक्सप्रेस आणि वास्को-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
दिल्ली एअरपोर्ट फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीमच्या डेटानुसार, काल सोमवारी दाट धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांसह सुमारे ३० फ्लाइट्सच्या आगमन आणि निर्गमनांमध्ये विलंब झाला.काही विमाने जयपुरला वळवण्यात आली.