Shubman Gill In Test : शुभमन गिल हा एकेकाळी भारतीय संघाचा पुढचा सुपरस्टार मानला जात होता. विराट कोहलीनंतर शुबमन गिल टीम इंडियाचा सुपरस्टार होईल, असे बोलले जात होते. गिल हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा फलंदाज आहे. पण कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या एका निर्णयामुळे गिलची कारकीर्द उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते आणि हा निर्णय त्याला कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा आहे.
युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या कसोटी पदार्पणानंतर शुभमन गिलला क्रमांक-३ वर खेळवले जाऊ लागले. जैस्वालने सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून कर्णधार रोहित शर्माचे मन जिंकले आणि भारतीय कर्णधाराने कसोटीत जयस्वालसोबत सलामी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी सलामीला आल्याने गिल तिसऱ्या क्रमांकावर आला, जो निर्णय त्याच्या कारकिर्दीसाठी चांगला सिद्ध होत नाही. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात गिल तिसऱ्या क्रमांकावर आला आणि केवळ 2 धावा करून बाद झाला.
जर आपण शुभमन गिलच्या शेवटच्या 6 कसोटी डावांवर नजर टाकली तर त्याने 30 धावांचा टप्पा गाठलेला नाही. या 6 पैकी गिल गेल्या चार डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे. मात्र, दोन डावांत तो सलामीवीर म्हणूनही खेळला आणि अपयशी ठरला. गिलने गेल्या 6 कसोटी डावांमध्ये 13, 18, 06, 10, 29* आणि 2 धावा केल्या आहेत, ज्यात सलामीवीर म्हणून 13 आणि 18 धावा आहेत आणि उर्वरित चार डावांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे.
गिलने 2023 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास सुरुवात केली आहे. यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिज दौऱ्यातच कसोटी पदार्पण केले. आता गिलचा खराब आकडा पाहता त्याला सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा संधी दिली जाते की नाही हे पाहायचे आहे.
आत्तापर्यंतची गिलची कसोटी कारकीर्द…
गिलने डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले, तेव्हापासून तो 18 कसोटी खेळला आहे. या सामन्यांच्या 33 डावांमध्ये त्याने 32.20 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.