Taimur : मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींची मुले शिकतात. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) ची स्थापना 2003 मध्ये नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली झाली. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मुले या शाळेत शिकतात.
ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात सतत नवीन मानके प्रस्थापित करत आहे आणि अवघ्या 20 वर्षांत जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या लीगमध्ये पोहोचली आहे. या शाळेत लहान गट ते बारावी पर्यत शिक्षण दिले जात आहे. 2003 पासून नीता अंबानी त्या शाळेच्या फाउंडर आणि अध्यक्ष आहेत.
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा ‘तैमुर अली खान’ने (Taimur Ali Khan) लहानपणापासूनच सर्वांचं लक्ष वेधलं. तैमुर (Taimur) जिथे कुठे जाईल, तिथे पापाराझींचे कॅमेरे त्याच्या अवतीभोवती आवर्जून पहायला मिळतात. एखाद्या सेलिब्रिटीइतकंच त्याचं स्टारडम आहे. तैमुरचं शिक्षणसुद्धा याच शाळेत सुरु आहे.
काही रिपोर्ट्सनुसार तैमुरच्या शाळेची फी तब्बल 1 लाख ते 20 लाख रुपयांदरम्यान आहे. फ्री स्ट्रक्चर वेगवेगळ्या क्लासेससाठी वेगळी आहे. करीना आणि सैफ हे तैमुरच्या शाळेच्या फीसाठी दर महिन्याला 1.70 लाख रुपये आणि वर्षाला 20.40 लाख रुपये खर्च करतात.
या शाळेत तैमुरसह शाहरुख खानचा मुलगा अबराम, ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, करण जोहरची दोन्ही मुलं शिकतात. एलकेजी क्लासपासून सातवीपर्यंत महिन्याची फी 1.70 लाख रुपये आहे.
शाळेत काय आहेत सुविधा?
– या शाळेत एकूण 60 वर्ग असून त्यात ती पूर्णपणे डिजीटल आहे.
– प्रत्येक वर्गात डिस्प्ले आणि राइटिंग बोर्ड, इंटरनेट कनेक्शन, कस्टम मेड फर्निचर, मल्टीमीडिया सपोर्ट आणि एसी आहेत.
– शाळेमध्ये टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच मैदानी खेळांसाठी अनेक पर्याय आहेत.
– खेळाचे मैदान 2.3 एकरात पसरलेले आहे.
– आर्ट रूम, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मल्टीमीडिया ऑडिटोरियम देखील आहे.
शाळेची फी किती आहे?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी 1 लाख 70 हजार रुपये आहे. म्हणजेच महिन्याला 14,000 रुपये. इयत्ता 8 वी ते 10 वी साठी ICSE ची वार्षिक फी 1,85,000 रुपये आहे. इयत्ता 8 ते 10 साठी IGCSE साठी वार्षिक शुल्क 5.9 लाख रुपये आहे. IBDP बोर्डाची इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये इतकी आहे.